दोडामार्ग /-

मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावर इतर सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. ह्या ठरावावर २८ सप्टेंबर रोजी मतदान झाले यावेळी कंटेंटमेन्ट झोन मधील सदस्य एकनाथ गवस हे सभागृहात हजर राहिले होते. हे सर्व तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांसमोर घडले त्यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही कार्यवाही केली. त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले आहे. न्याय मिळेपर्यंत त्यांनी मागे न हटण्याचा पवित्रा घेतला आहे.

याला दोडामार्ग भाजपाने जाहीर पाठींबा दिला असून सत्तेच्या जोरावर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेनेने हा अविश्वास ठराव यशस्वी केल्याचा आरोप यावेळी भाजपा सरचिटणीस रंगनाथ गवस यांनी केला आहे तर शासनाचे नियम फक्त सामान्यासाठीच आहेत का? सामान्य माणसांना नाहक त्रास देणाऱ्या शासनाला हा प्रकार दिसत नाही का असा सवाल करताना भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष चेतन चव्हाण यांनी शासनाच्या कृतीचा निषेध केला आहे.

यावेळी बाळा नाईक यांसह जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत आठलेकर, संजय मणेरीकर सरचिटणीस रंगनाथ गवस, प्रविण गवस, शक्तिकेंद्रप्रमुख योगेश महाले, कोनाळ सरपंच पराशर सावंत, समीर रेडकर, मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस,सुमित म्हाडगुत, युवा मोर्चाचे अभिमन्यू गवस यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page