✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्षनिरिक्षक राजेंद्र फाटक यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या धडाकेबाज ऐंट्रीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटात कार्यकर्त्यांनमध्दे ऐक नवचैतन्य निर्माण झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसत आहे.गेले चार ते पाच दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक पदी ठाण्याचे तरुण तडबदर शिवसेना शहर प्रमुख श्री. राजेंद्र फाटक यांची निवड करण्यात आली असून ते पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत.फाटक यांची सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक नेमणूक झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील शिवसेना पदाधकाऱ्यांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात फिरत असताना त्यांचा कामांचा वेग पाहता सिंधुदुर्ग जिलह्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यातमध्ये ऐक नव चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.त्यांच्या निरीक्षक पदी निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेत मोठी उभारी होऊ शकते,जिल्ह्यातील सावंतवाडी,कुडाळ,कणकवली या भागातील कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या गाठी -भेटी झाल्या असून वेगवेगळ्या विकास कामा संदर्भात आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

या भेटी देण्यात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सचिव किसन मांजरेकर ,कणकवली तालुका प्रमुख भूषण परुळेकर, कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर ,युवा जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर , मालवण तालुका प्रमुख महेश राणे,उपजिल्हा प्रमुख महेंद्र सावंत,कणकवली समन्वयक सुनील पारकर ,हे प्रमुख पदाधिकारी आज त्यांच्यासोबत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page