✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

तालुक्यातील गिरगाव कुसगाव ही वस्तीची गाडी बंद झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत.त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजयजी पडते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा सेनेच्या शिष्टमंडळाने डेपो अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली व वस्तुस्थिती सांगून गाडी पूर्ववत सुरू करावी अशी मागणी लावून धरली यावर डेपो अधिकारी यांनी गाडी पुर्वी प्रमाणे चालू करण्याचे आश्वासन दिले तसेच पांग्रड कणकवली ही गाडी सुरू करावी अशी मागणी केली असून ती सुद्धा लवकरच चालू केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच ड्रायव्हर व कंडक्टर यांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत वतीने करण्यात आली आहे असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी शहर प्रमुख राजू गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप, सरपंच सौ कावेरी चव्हाण, मंगेश मर्गज, विश्वनाथ मर्गज, सुरेश मर्गज, आनंद मर्गज आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page