▪️शिंदे गटाच्या शिवसेना महिला जिल्हाआघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांचा कुडाळ पोलीसांना निवेदन देत दिला ईशारा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित आहेत गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्या दारूबाबत संबधित विभागासह पोलिसांनी ठोस पावले उचलली नाही तर या दारूच्या विरोधात जिल्हा शिवसेना महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी दिला.यावेळी कुडाळकर यांच्या सोबत ,जिल्हा सचिव किसन मांजरेकर , कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख योगेश तुळसकर ,उपतालुका प्रमुख अरविंद करलकर, महिला कुडाळ आघाडी प्रमुख सिद्धी शिरसाट ,विभाग प्रमुख आशू अग्रवाल पुंडलिक जोशी उपस्थित होते.

दरम्यान जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क मोठया प्रमाणात धाडी टाकून दारू जप्त करते त्या दारूचे पुढे काय? की संगनमताने टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई केल्याचे भासाविण्यात येते? महसूल विभाग जसा अवैध वाळू धंद्यांविरोधात कारवाई करतात त्याच्या पाव टक्का कारवाई जरी दारुधंद्या विरोधात केली तरि मोठ्या प्रमाणात या दारू धंद्याला आळा बसेल.त्याचप्रमाणे अंमली पदार्थाची देवाण घेवाणही मोठ्याप्रमाणात जिल्ह्यात सुरू आहे.यामुळे तरुण पिढी अंमली पदार्थाची विळख्यात सापडली आहे.असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

सिंधूदुर्ग जिल्ह्यात गेले काही महिने दारूधंद्याला मोठ्या प्रमाणात उत आला आहे या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन संपवित आहे मागील गेल्या दोन ते तीन महिन्यांत कुटुंबातील दोन दोन माणसानी दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन संपविले आहे पिंगुळीमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना अलीकडेच घडल्या आहेत.अलीकडेच पींगुळी सराफदारवाडी येथे रेल्वे ट्रकवर दारू पित असताना अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता.आठ दिवसापूर्वीच पिंगुळी येथे गोवा येथून दारूची वाहतूक करणारी कार कमानीवर आदळून अपघात झाला होता,अशाप्रकारे असे अवैध धंदा करणारे बेदरकार गाड्या चालवून जनतेच्या जीवितासही धोका निर्माण करतात.अशा धंद्यामुळे मोठ्याप्रमाणात आर्थिक फायदा होत असल्यामुळे सांगायचे म्हणजे ही कार वाहतूक करणारी मुले 18 ते 20 वयोगटातील होती दारूमुळे आज अनेक कुंटूबाची वाताहात झाली आहे. दारूमुळे कुटुंबात होणारी भांडणं विकोपाला जावून त्याचे परिणाम जीव घेण्यापर्यंत जात आहे.

आत्ताच आपल्या जिल्ह्यात अशा कितीतरी घटना घडल्या आहेत,कसाल, देवगड, वैभव वाडी येथील घटना पाहता दारूमुळे रक्ताच्या नात्याचाही विसर पडलेला दिसत आहे. देवगड मध्ये तर जन्मदात्या आईसह भावाचा दारुसाठी नशेत केलेला खून सर्व सिंधुदुर्ग वासियानी ऐकलं, वाचलं असेल,अशा प्रकारच्या घटना घडत असताना गोवा सरकारच्या तिजोरीत भर घालण्यासाठी हे अवैध दारूधंदे समंधितांच्या जोरावर खुले आम चालत आहे. देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा,देशातला पहिला 100 टक्के साक्षर जिल्हा, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा, महाराष्ट्रातील सलग 5 वर्षे 10/ 12 वी मध्ये सर्वाधिक निकालाचा जिल्हा,हुंडाबळी नाही,शेतकरी आत्महत्या नाही, लिंग प्रमाण समतोल असणारा एकमेव जिल्हा म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ख्याती असताना या अवैध दारू धांद्याचे लागलेले गालबोट आपल्या जिल्ह्याचे नाव बदनाम करत आहे.गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारू येते ही दारू जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते राज्य उत्पादन शुल्क हा विभाग जिल्ह्यात सापळे लावून वाहनासह लाखो करोडो रुपयांची दारू जप्त करते पण या दारूचे पुढे काय झाले? याबाबतचा प्रश्न संशयाच्या फेऱ्यात नेतो दारूमुळे अनेकाचे संसार उदध्वस्त झाले.

दारूमुळे अनेक खून,मारामाऱ्या झाल्या आणि आजही होत आहेत दारूमुळे महिलांना सुद्धा अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे
एकूणच या वाढत्या दारूवर संबधित यंत्रणेने ठोस पावले उचलली पाहिजेत भविष्यात या दारूमुळे उद्धस्त होणारे अनेकांचे संसार वाचले पाहिजेत तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी ठोस उपाययोजना व भविष्यातील नियम अमलात आणणे काळाची गरज आहे आताची पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे पुढील पिढी जाऊ नये यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत सतत चालणाऱ्या या गोवा दारूला आळा घालण्याच्या दृष्टीने आपण योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकावी अन्यथा शिंदे गटाची शिवसेना दारू विरोधात महिलांसमवेत रस्त्यावर उतरेल असा इशारा श्रीमती कुडाळकर यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस निरीक्षक कुडाळ यांना देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page