✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील फ्लॅटच्या बेडरूममध्ये अडकलेल्या दोन वर्षाच्या मुलाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. भटवाडी येथील नक्षत्र बिल्डिंग फ्लॅटच्या बेडरूमच्या आतून दोन वर्षाच्या लहान लाकडी घातली व बाहेर येता येत नसल्याने तो मुलगा जोरजोराने रडू लागला. हा प्रकार त्या मुलाच्या आईच्या लक्षात येतात तिनेही आरडाओरड सुरू केली सदर प्रकार पाहून शेजाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली असता सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर व शामराव हळदणकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तिसऱ्या मजल्यावर बाहेरून बिल्डिंगवर चढून मोठ्या कसरतीने बेडरूमच्या खिडकीचे ग्रील कापून खिडकीतून बेडरूम मध्ये प्रवेश केला व त्या मुलाला सुखरूपपणे बाहेर काढून पालकांच्या ताब्यात दिले. यावेळी सदर मुलगा प्रचंड भयभीत झाला होता. सामाजिक बांधिलकीच्या या कार्यकर्त्यांचे मुलाच्या कुटुंबीयांनी आभार मानले. या घटनेमुळे सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
