▪️भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघात उपस्थिती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

देशभरात लाखो प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरु करण्यात अली त्याबरोबरच किसान १४ वा हप्ता ८. ५० कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला .या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघात करण्यात आले.

या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश व सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश निमंत्रित बंड्या सावंत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ संध्या तेरसे, नेते व माजी उप सभापती राजू राऊळ , जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई , कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, विजय कांबळी सरचिटणीस, योगेश बेळणेकर सरचिटणीस, कुडाळ नगर पंचायत विरोधी पक्ष गटनेते विलास कुडाळकर ,नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर ,भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष पप्या तवटे,रुपेश कानडे, सौ प्रज्ञा राणे, सौ विशाखा कुलकर्णी तसेच जिल्हा कृषी अधिकारी विजय राऊत, तालुका कृषी अधिकारी घाटकर , अमोल करंदीकर , आर एस चव्हाण , पंचायत समितीचे प्रफुल्ल वालावलकर तसेच इतर अधिकारी ,शेतकरी , कुडाळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश तेंडुलकर , व्यवस्थापक नंदकिशोर करावडे ,खत विभाग प्रमुख सतीश आंबडोस्कर , लिपिक क्रांती मेस्त्री आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आर. सी. एफ. चे अधिकारी वराडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page