▪️भविष्यात आपल्या भागात सूचना असतील तर,याच प्रकारे अलर्ट दिला जाईल..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
तुमच्या मोबाईल मध्ये “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज आला असेल तर घाबरू नका.शासनाकडून आपत्कालीन व्यवस्थे संदर्भात माहिती देण्यासाठी “चेकिंग” सुरू आहे. शासनाकडून ही यंत्रणा भविष्यात राबविण्यासाठी चेकिंग सुरू आहे.या मॅसेज संदर्भात खातरजमा केली असता तो मॅसेज शासन दरबारातून चेकिंग साठी पाठवल्याचे समजते.कोणा कोणाच्या मोबाईलवर असा इशारा आला?? सध्या केंद्र सरकार Emergency Alert ची चाचणी घेत आहे. भविष्यात आपल्या भागात काही Emergency सूचना असेल तर आपल्या मोबाईलवर त्याचा याप्रकारे Alert दिला जाईल.मोबाईल मध्ये असे Wireless Alert बंद करण्याची सुविधा देखील दिलेली आहे, परंतु आपण त्याचा वापर करू नये.भविष्यात आपल्या भागात काही Emergency असेल आणि आपल्याला असा Alert आल्यास त्यावर दिलेल्या सूचना जरूर वाचा आणि त्याप्रमाणे कार्य करा.घाबरू नका..ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
आज सकाळपासून अनेक जणांच्या मोबाईलवर “इमर्जन्सी अलर्ट” असा मेसेज येत आहे अलर्ट फ्रॉम डिपार्टमेंटल ऑफ टेलिकम्युनिकेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया असा हा मेसेज आहे. या पार्श्वभूमीवर वर कंपनीचे संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल आपत्कालीन परिस्थिती माहिती देण्यासाठी हा अलर्ट असल्याचे सांगितले.सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अपघात होऊ शकतो किंवा अनुचित परिस्थिती निर्माण होऊ शकते.त्याबाबत माहिती देण्यासाठी हा या अलर्ट चा वापर करण्यात येणार असल्याचे समजते.
