▪️ राष्ट्रवादीच्या त्या नऊ जणांची केलेली हकालपट्टी हास्यास्पद,काका कुडाळकरांचे प्रत्यूत्तर..
✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी– कुडाळ.
राज्यात सध्या ज्याकाही वेगाने घडामोडी घडल्या त्याचा विचार करता आम्ही उपुख्यमंत्री अजित पवार गटाला पाठिंबा देतोय आम्ही विकासाच्या बाजूने आहोत.आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही आणि आम्ही राष्ट्रवादीतच, अजित पवार यांच्या नेृत्वाखालील आणि सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार आहोत.गेल्या साडेतीन वर्षात प्रदेश कार्यकारणीची ऐक -पण बैठक नाही.प्रदेश कार्यकारणी निष्क्रिय असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन गट झाले.मुळात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदरणीय आहेत.अजित पवार यांच्याजवळ पक्षाची धुरा दिली पाहिजे अशी राज्यातील माझ्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांची अपेक्षा होती.ती दिली गेली नाही आणि राज्यात वेगान संघटना वाढवणाऱ्या नेत्याची गरज होती तो नेता आम्हाला मिळाला त्यामुळें आम्ही अजित पवार यांच्याजवळ गेलो.यात आमच्यातल्या काही जणांची हकालपट्टी केली गेली हे मुळात हास्यास्पद आहे.असे आज कुडाळ रेस्ट हाऊस येथील पत्रकार परिषदेत प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर बोलत होते.
पुढे काका कुडाळकर बोलताना म्हणाले की,आमचे नेते शरद पवार आहेत,काही झाले तरी आम्ही राष्ट्रवादी सोडली नाही.आणि सोडणार नाही.त्यामुळे आमची हकालपट्टी केली, असे जाहीर करणाऱ्यांची कीव येते.यावेळी त्यांनी प्रदेश कार्यकारणी वर नाराजी वेक्तं केली. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीत दोन गट पडले.आणि पक्षाची पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच आम्हाला विकासासाठी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असे कुडाळकर यांनी सांगितले.काल कुडाळकर यांच्यासह अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीत गेलेल्या नऊ जणांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली होती. त्यावर कुडाळकर यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्यूत्तर दिले.
यावेळी यावेळी प्रदेश संघटक सचिव,श्री.काका कुडाळकर यांच्या सोबत प्रफुल्ल सुद्रिक जिल्हा अध्यक्ष-युवक राष्ट्रवादी काँग्रेस,अभिनंदन मालेडकर – अध्यक्ष- कणकवली मतदार संघ, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष मकरंद प , हार्दिक शिगले, जिल्हा अध्यक्ष – चित्रपट कला साहित्य ,सर्फराज नाईक प्रदेश सरचिटणिस अल्पसंख्याक – रुजाय कर्नाडीस सरचिरणिस – युवक, असलम खतिव तालुका सरचिटणिस – सावंतवाडी ,राजू धारपवार माजी युवक लालुका अध्यक्ष सावंतवाडी ,
वैभव रावराणे जिल्हा सरचिटणिस – युवक ,हर्षद बेग ,संकेत सावंत युवक अध्यक्ष- युवक वैभववाडी , शैलेश वाड तालुका अध्यक्ष- युवक वैभववाडी ‘युवक विधानसभा अध्यक्ष, शैलेश लाड ,महेश मोरे ,अशोक सावंत ,अमोल आमकर – लालुका सचिव युवक वैभववाडी, अरुण मेस्त्री,
युसूफ नाईक, तन्नाम नाईक ,अभिजित परब ,जावेद मिर प्रमुख पदाधिकारी उपसथित होते.
