✍🏼लोकसंवाद /-समील जळवी, कुडाळ.
सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांना रिक्षाचालकांनी सी. एन. जी. गॅस सेंटर कुडाळ शहरामध्दे सुरू व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.संजय शारबिद्रे यांच्या नेृत्वाखालील निवेदन देण्यात आले.सध्याच्या परीस्थिती पाहता कुडाळ शहरानजीक एकही सी. एन. जी. गॅस सेंटर नाही. त्यामूळे गॅस भरणा साठी रिक्षा चालकांना ऐक तर,झाराप झिरो पॉइंट ला जावे लागते.किंवा ओरोस येथे जावे लागते. झाराप पर्यंतचे अंतर हे कुडाळ येथुन १२.k.m पर्यंत आहे.आणी ओरोस पर्यंतचे अंतर हे १६.k.m. आहे त्यामुळे रिक्षा चालकांना गॅस भरणा साठी ये..जा.. करणे परवडणारे नसून गॅस भरण्यासाठी येवढ्या लांब जाऊन गॅससाठी रांगाच्या रांगा लागतात रांगेत उभे राहून सी. एन. जी. गॅस १००% मिळेलच याची शाश्वती नसते.त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मोठ्या प्रमाणावर भुरदंड सोसावा लागत आहे.यासाठी कुडाळ शहरात एखादे गॅस स्टेशन व्हावे अशी मागणी रिक्षा चालकांकडून होत आहे.याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना, सिंधुदुर्ग यांनी जिल्हाध्यक्ष श्री.संजय शारबिद्रे यांच्या नेृत्वाखालील जिल्हाधिकारी यांच्याजवळ निवेदन देत कुडाळ शहरात सी. एन. जी. गॅस सेंटर ची मागणी केली आहे.यावेळी त्यांच्या सोबत निलेश मातोंडकर , बाबू सावंत , सुरेंद्र सावंत ,संजय मसुरकर,दाजी गावडे ,प्रभाकर काराणे , पपू गवस उपस्थित होते.