✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

कणकवली गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. त्यातील एक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. तर त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपी वैभव सीताराम पांगम वय (२५ वर्षे), स्वप्नील सुरेश कुडतरकर ( वय ३० वर्षे), रामदास तुकाराम पांगम (तिघे रा. नाटळ, ता. कणकवली) असून यातील संशयित आरोपी रामदास पांगम हा पसार झाला आहे.एलसीबी पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांनी स्वतः फिल्डवर उतरत ही कारवाई केली. एलसीबी पीआय श्री. भोसले यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शेळके, हवालदार राजू जामसंडेकर, गुरू कोयंडे, श्री. गंगावणे, कृष्णा केसरकर यांनी ही कारवाई सकाळी ३ वा. २१ मिनिटांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page