▪️वंदे भारत मधून प्रवास करून आनंद अनुभवता आला,पत्रकारांशी दिलखूलास संवाद..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

कोकण रेल्वेचे दुपरीकरण हेच आमचे पुढचे टार्गेट आहे ते स्वप्न यशस्वी झाल्यानंतर याचा फायदा कोकणाला होणार असून या ठीकाणी पर्यटन आणी दळणवळण वाढण्यास मदत होणार आज या गाडीत बसून कोकणातील निसर्गाचा आस्वाद घेता आला याचा आनंद आहे असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सावंतवाडीत थांबावी ही शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केलेल्या मागणीला आपला ही पाठींबा आहे भविष्यात ही रेल्वे सर्व तिर्थक्षेत्रावर जावी असा आमचा मानस आहे आणी त्या दृष्टीने आमचा पाठपुरावा असेल असे ही ते म्हणाले मडगाव येथे वंदे भारत एक्सप्रेसचे उदघाटन आज मोदींच्या हस्ते हीरवा झेंडा दाखवून करण्यात आले त्यानंतर श्री चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासह वंदे भारत म्हणून प्रवास करण्याचा आनंद घेतला यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला
यावेळी ते म्हणाले केवळ मोदीच्या संकल्पनेमुळे वंदे भारतचे स्वप्न पुर्ण झाले आहे त्यामुळे आता या टे्रन मधून अनेक लोकांना चांगली सेवा मिळणार आहे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दळणवळण वाढणार आहे त्यामुळे आपसूकच कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या सर्व गावांचा विकास होणार आहे
ते पुढे म्हणाले वंदे भारत हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे भविष्यात ही रेल्वे देशातील सर्व तिर्थक्षेत्रावर जावी असा मानस आहे लवकरच याबाबत धोरण ठरविण्यात येणार आहे आजच्या उदघाटना नंतर भारताने आणखी एका क्षेत्रात पाउल पुढे टाकल्याचा आनंद आहे मात्र कोकणाबाबत निर्णय घेताना आम्ही काही गोष्टीत सकारात्मक आहोत सदयस्थितीत ही गाडी मडगाव ते मुंबई असे जाण्यासाठी दहा तास लागणार आहेत पावसाळ्यानंतर आठ तास लाणार आहे मात्र कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांची संख्या लक्षात घेता आणी भविष्यात पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी कोकण रेल्वेचे दुपदरीकरण हे आमचे टार्गेट आहे आणी त्यासाठी आमचा पाठपुरावा असणार आहे त्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page