▪️प्रमोद जठार,आमदार नितेश राणे, राजन तेली, अतुल काळसेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी होते उपस्थित..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या “मेरा बूथ सबसे मजबूत ” कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी ऑनलाइन स्वरूपात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कणकवलीत प्रहार भवन येथे हे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे मोदी @ ९ अभियानाचे सह संयोजक प्रमोद जठार,प्रदेश भाजपा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, कणकवली ,देवगड,वैभववाडी मतदार संघाचे भाजपचे आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजेन चीके, सरचिटणीस मनोज रावराणे, संदीप साटम वैभववाडी नगराध्यक्ष माईंनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, प्राची तावडे ,संजना सदडेकर, प्राची करपे, भाग्यलक्ष्मी साटम,सुरेश सावंत, अरविंदराव रावराणे, राजू म्हापसेकर,बाळ खडपे, भालचंद्र साटे, प्रकाश राणे, तालुका अध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, नाशिक काझी, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, श्री साटम, रवी पालेकर,यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.