सावंतवाडी /-
सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील उपजिल्हा रुग्णालय जवळ जागेतच होणार आहे न्यायालयात असलेला जमिनीचा प्रश्न महाराष्ट्र शासन लवकरच सोडवेल तसेच जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीत पोस्ट केले आहे अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई हून झूम ॲप द्वारे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले मी गेले सहा महिने आजारी होतो त्यामुळे जिल्ह्यात येऊ शकलो नाही पण लवकरच सावंतवाडीत येणार आहे मी पालकमंत्री असताना चांदा ते बांदा योजना आणली होती ही योजना सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती केली आहे. त्यांनी या योजनेतील मंजूर कामांना निधी देण्याचे आश्वासन दिले असून दोन वर्ष या योजनेला मुदतवाढ दिली आहे. व त्यानंतर ती सिंधुरत्ना म्हणून ओळखली जाईल असे ते म्हणाले सावंतवाडी व दोडामार्ग येथे शंभर एकर जागेत आयुर्वेदिक एक संशोधन केंद्र होणार आहे त्या जागेची पाहणी आडाळी येथे करण्यात आली आहे. तसेच तिलारी येथे 160 एकर जागेत वन्य प्राणी केंद्र उभारण्यासाठी ची जागा पाटबंधारे विभागाने दिली आहे.
त्याची प्रक्रियाही सुरू आहे जिल्ह्यातील खराब झालेले रस्त्यांना निधी मंजूर करून लवकर लवकरात या रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे असे अनेक कामे मार्गी लागावीत यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे ते म्हणाले ओरस येथील जिल्हा मुख्यालयाच्या साठी 25 कोटी रुपये मंजूर आहेत त्यापैकी दहा कोटी रुपये उपलब्ध व्हावेत तसेच बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे 20 टक्के रक्कम त्वरित द्यावी श्रीमंत शिवराम राजे भोसले मराठा वस्तीगृह नटसम्राट मच्छिंद्र कांबळे वस्तीगृह सुरू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही केल्या आहेत असे ते म्हणाले.