लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ.
१० वी १२ वी शालान्त परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कुडाळ तालुका वैश्य वाणी समाजातर्फे गौरव व सत्कार सोहळा आयोजित केला आहे.फक्त वैश्यवाणी समाजातील वैश्यज्ञानातील गरजू शालोपयोगी वस्तुचे वितरण आणि हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी “कुडाळ तालुका वैश्यवाणी समानतर्फे ज्ञानातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुचे वितरण करण्यात येणार आहे लाभ घ्यावयाचा असेल अज्ञानी गुरुवार दिनांक २९ जून २०२० पर्यंत प्रत्येक गावातील कमिटीकडे अर्ज करावेत, तालुक्यात पावशी, खुटवळवाडी, खोचरेवाडी, कसाल, आंब्रड, पोट, जांभवडे पक लेकर माणगाव या ठिकाणी ग्रामसमित्या स्थापन केलेल्या आहेत. या गावातील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज प्रमुख हयांच्याजवळ गुरूवार दिनांक २९ जून २०२३ पर्यंत द्यावयाचे आहेत.
तसेच समिती प्रमुख शुक्रवार दिनांक ३० जून २०२३ पर्यंत आपल्या शिफारसी सह संस्थेचे खजिनदार श्री. विजय रा.भोगटे भोगटे इंजिनिअरींग वर्क्स, उद्यमनगर, कुडाळ यांच्या सादर करावयाचे आहेत.वरील गावा व्यतिरिक्त असलेल्या गावातील व कुडाळ शहरातील विद्यार्थीनी आपले अर्ज ,गुरुवार दिनांक २९ जून २०२२ पर्यंत श्री. सुनिल धुरी यांचेकडे द्यावेत.अर्जासोबत मार्कलिस्ट प्रत आवश्यक आहे. किमान ४०% च्यावर मार्क असलेले अर्ज स्विकारले जातील.रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महालक्ष्मी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व गरजू व होतकरू विद्यार्थी / विद्यार्थीनींना शालोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे.
तसेच स्कॉलरशिप व इयत्ता १० वी ७०% व १२ वी मध्ये ७० पेक्षा जास्त गुण मिळविले विद्यार्थी/ विद्यार्थीनींनी सत्कारासाठी आपली नांवे स्थापन केलेल्या ग्रामसमितीकडे व वर उल्लेखले पदाधिकान्यांकडे गुरुवार दिनांक २९ जून २०२३ पर्यंत गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करावीत तसेच ९०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या मुला, मुलींचा खास सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.असे संस्थेचे कार्यवाह, सौ. सुचित्रा विजय भोगटे कळवितात.वैश्य समाजातील स्कॉलरशिप व इ.१०वी, १२वी परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थाचे अभिनंदन! तसेच वैश्यभवन वसतिगृहमध्ये प्रवेश सुरू आहे.तरी इच्छुकांनी संपर्क साधावा,अर्ज स्विकारले जातील,श्री. भार्गवराम उर्फ अजित का. धुरी, गुरूकृपा स्टोअर्स बाजारपेठ कुडाल, मोबा. ९४२१२३०३७४. श्री. सुनिल धुरी, शिवाजीनगर कुडाळ,सौ. अस्मिता दत्तात्रय बांदेकर, अध्यक्ष वैश्य समाज कुडाळ. यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.स्थळ :महालक्ष्मी हॉल हॉटेल गुलमोहर शेजारी, कुडाळ.