▪️बस १२ फुट दरीत कोसळली.;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली..

✍🏼लोकसंवाद /- मालवण.

मालवण येथील आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटणारी मालवण बार्शी एसटी बस कुपेरीची घाटीत कोसळल्याची घटना घडली आहे. येथील तीव्र उताराच्या वळणावर चालत्या बसचे स्टेअरींग लॉक झाल्याने सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चालकासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. रस्त्याच्या खाली १२ फुट कोसळून ही बस दोन वेळा गटांगळ्या खाऊन उभी राहिली. नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या भिषण अपघाता नंतरही कुणाला मोठी दुखापत झाली नाही. बसचालक श्री. सांगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.. याबाबतची माहिती अशी- मालवण आगारातून पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण – बार्शी (एम एच २० – बी एल. २९५८) या बसमध्ये १८ प्रवाशी प्रवास करत होते. बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही बस रस्त्याच्या बाजुला कोसळत दोन वेळा पलटी होत उभी राहिली. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली आहे. वाहक देशमुख व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले.पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालक तसेच कुणकवळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मालवण आगाराचे व्यवस्थापक आणि कर्मचारी चालक यांनीही अपघातस्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page