✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर च्या माध्यमातून भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांच्याबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर अपलोड केला असून, त्यांना बदनाम करत त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचे काम त्यांनी केले आहे.जितेंद्र आव्हाड यांनी महिलांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षा तथा ,नगरसेविका सौ.संध्या तेरसे यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक श्री. चिंदरकर यांच्याजवळ निवेदन देत मागणी केली आहे.सौ.संध्या तेरसे यांच्या सोबत महीला आघाडीच्या कुडाळ तालुका मंडळ अध्यक्ष| आरती पाटील, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर,नगरसेविका चांदणी कांबळी,तालुका चिटणीस रेवती राणे आदी उपस्थित होत्या.
