✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

कोलगाव येथील हळदणकर कॉलनीत बंद खोलीत एका वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे.खोलीला आतून कडी असल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने किंवा अन्य काही कारणामुळे संबंधिताचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संबंधित व्यक्तीची अद्याप पर्यंत ओळख पटलेली नाही.याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.तसेच तुर्तास तरी संशयास्पद असे काहीच नाही, असे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संबंधित वृध्द व्यक्ती त्या खोलीत गेले अनेक दिवस एकटीच राहत होती. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेले काही दिवस ते आजारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page