आमदर दीपक केसरकरांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार..आमदर दीपक केसरकरांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार..

▪️लोकसंवाद /- सावंतवाडी.

सावंतवाडी शहरातील विकासकामांसाठी भरघोस निधी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सावंतवाडीकरांच्या वतीने युवराज लखमराजे व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनाही गौरविण्यात आले. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राणेंचे आभार मानले. सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांना कोट्यावधीचा निधी दिल्या बद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी आज कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी खासदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, सावंतवाडी नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्यकार्यकारी प्रजित नायर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष संजू परब, कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page