✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कणकवली शहरातील मराठा मंडळकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज मोठ वटवृक्ष कोसळला. हा वृक्ष वीज तारांवर कोसळल्याने बिजलीनगर भागातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर तहसीलदार रमेश पवार, शिवसेनेचे युवा जिल्हा संघटक सुशांत नाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान येथील वृक्ष बाजूला करून रस्ता खुला करण्यासाठी महसूल विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. आज सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले होते. या वाऱ्यामध्ये येथील वृक्ष कोसळून मराठा मंडळकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
