✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
यज्ञेश पोकळे या विद्यार्थ्याने बारावी मध्ये आपल्या अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविले त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यज्ञेशचे अभिनंदन केले व कौतुकाची थाप दिली यज्ञेशच्या या यशासाठी त्याची आई वडील या दोघांचे देखील अभिनंदन केले तसेच भविष्यात कोणतीही गरज यज्ञेश ला भासल्यास संपर्क साधण्याची विनंती केली यावेळी राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक,युवक तालुका अध्यक्ष नयन गावडे, कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर,सतीश जाधव, व यज्ञेश चे आई-वडील उपस्थित होते त्यांनी यावेळी जिल्हाध्यक्षांचे आभार मानले.