मसुरे /-

बिळवस ग्रामपंचायत सरपंच पदी मानसी लक्ष्मण पालव यांची मंगळवारी दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. जाधव यांनी काम पाहिले. बिळवस ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली नाईक यांचे अपघाती निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवरती प्रशासनाने मंगळवारी पोट निवडणूक जाहीर केली होती. मानसी पालव यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे सरपंच निवड बिनविरोध झाली. सरपंच पद इतर मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. उर्वरित चार वर्षे अजून कार्यकाल शिल्लक असल्यामुळे नूतन सरपंच यांना चांगले काम करता येणार आहे.
मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन गतवर्षी बिळवस ग्रामपंचायत उदयास आली होती. थेट सरपंच म्हणून रूपाली नाईक यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली होती.त्यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला होता. दोन महिन्यापूर्वी रुपाली नाईक यांचा मोटार सायकल अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त झाले होते.
निवड कार्यक्रम प्रसंगी सदस्य संतोष पालव, चैताली भोगले, रंजना पालव, श्री संजय सनये, ग्रामसेवक युगल प्रभूगावकर,नागेश भोगले, तातू भोगले, पोलीस पाटील गोविंद सावंत, गोपाळ पालव, भास्कर पालव, मनोज पालव,अजित पालव, समीर पालव, भावेश पालव, विकास सावंत, अरविंद पालव, रमेश पालव, भाई सावंत ,अशोक सावंत, कृष्णकुमार पालव, राम पालव, लक्ष्मण पालव, शार्दुल पालव, महादेव ऊर्फ आबा पालव, अजय पालव, बाबुराव भोगले आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी नूतन सरपंच मानसी पालव म्हणाल्या, येथील विकास हा सर्वांना सोबत घेऊन करण्यात येईल. उर्वरित विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी आपण त्या त्या भागातील ग्रामस्थांना सोबत घेऊन सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य, वरिष्ठ जाणकार, अधिकारी वर्ग,लोकप्रतिनिधी यांच्याशी एक दिलाने काम करून बिळवस ग्रामपंचायत राज्यात आदर्श ठरेल अशाप्रकारे काम करण्याचा मानस व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page