▪️वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे 15 कोटी रुपयांचे बक्षीस..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
शहर सौंदर्य करणं अभियान स्पर्धा २०२३ मध्ये क वर्ग नगरपरिषदा मध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेला राज्यात प्रथम क्रमांकाचे १५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये शहर सौंदर्य करणं अभियान अंतर्गत शहर सौंदर्य करणं व स्वच्छता स्पर्धा २०२२ मध्ये ३० सप्टेंबर रोजच्या शासन निर्णयाव्दारे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत क वर्ग न. प. मध्ये वेंगुर्ले न. प. चार राज्यांत प्रथम क्रमांक आला असून १५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे.
शहर सौंदर्यीकरण २०२३ या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत राज्यात आपला डंका कायम ठेवला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे १५ कोटींचा धनादेश व प्राणपत्र देत वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याधिकारी डॉ अमितकुमार सोंडगे उपस्थित होते.
मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी काही महिन्यांपूर्वीच नगरपरिषदेचा कारभार स्वीकारल्यानंतर नगरपरिषदेवर नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यकारणी नसताना सुद्धा यशस्वीपणे शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत भाग घेत आपल्या उत्कृष्ट कामाचे प्रदर्शन त्यांनी दाखवून दिले. शहरातील स्वछतेचा दर्जा कायम ठेवत संपूर्ण शहरातील भिंतींवर सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व वेंगुर्ला शहराची संस्कृती सांगणारी भित्तीचित्रे काढुन शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि याचेच फलित म्हणून या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषद अव्वल ठरली व वेंगुर्ला शहराचा डंका कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या यशाबद्दल वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते हे बक्षीस मुख्याधिकारी परितोष कंकाळ व डॉ अमितकुमार सोंडगे यांचेकडे 15 कोटी रकमेचा धनादेश गुरुवारी प्रदान करण्यात आला.
