✍🏼लोकसंवाद/- सिंधुदुर्ग.

ठाकरे गटात अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर दिसून आल्याची चर्चा कुडाळ मतदारसंघात रंगू लागली आहे.रविवारी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस मतदार संघात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.यावेळी मात्र खासदार विनायक राऊत हे अनुपस्थित राहिले तर,दुसऱ्या दिवशी सोमवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाला मात्र विनायक राऊत यांनी आपण केक आणून आवर्जून हजेरी लावली.आणि आमदार वैभव नाईक आपण वेगळा केक आणून खासदार विनायक राऊत गेल्यानंतर हजेरी लावली.यामुळे आमदार नाईक व विनायक राऊत यांच्यातील अंतर्गत वाद असल्याचे चर्चा कुडाळ – मालवण मध्ये रंगू लागली आहे.

तर दुसरीकडे माणगाव खोऱ्यात देखील आमदार वैभव नाईक यांचे वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले आहेत.त्यामुळे वैभव नाईक यांच्यावर रोष कुडाळ मालवण मध्ये दिसतोय आहे.तर खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसां पुर्वी कुडाळ – मालवण मतदार संघात जिल्हाप्रमुख पदी असलेले वैभव नाईक यांची हकालपट्टी करून त्याठिकाणी संजय पडते यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे आता पुढील विधानसभा निवडणूक कुडाळ – मालवण मधून ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते हे निवडणूक लढवणार की,आमदार वैभव नाईक लढवणार हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल.

तर दुसरीकडे विशाल सेवा फाउंडेशन व भाजपच्या माध्यमातून माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवगर्जना कार्यक्रम भरवण्यात आला होता.यात कुडाळ वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला.त्यामुळे वैभव नाईक हे कुठेतरी पिछाडीवर जात असल्याचं राजकीय विश्लेषकांमध्ये बोलले जात आहे.तर निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मध्ये आता जोरदार मुसंडी मारली असून ते कुडाळ – मालवण मतदारसंघात विविध प्रश्नांकडे नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना दिसत आहेत.

एकिकडे आमदार वैभव नाईकांची एसीबीमार्फत अचानक चौकशीही केली जात आहे.तर एसीबीच्या नोटीसाने वैभव नाईक यांनी धसका घेतला आहे.तसेच आमदार वैभव नाईक हे कुठेतरी आता सैरभर झाले असल्याची देखील चर्चा सुरू आहे.तर 2024 च्या विधानसभा निवडणूकित वैभव नाईक हे निवडणूक लढविणार की? माघार घेणार? की, ठाकरे गट आमदार वैभव नाईक यांना सोडून ईतर कोणाला उमेदवारी देणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page