✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल, ता.२१ला आयोजित आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकार वैशाली खानोलकर हिचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते,तहसीलदार अमोल पाठक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, उद्योजक बापू नाईक नगराध्यक्ष आफ्रिन करोल उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, ओरोस मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, आदि उपस्थित होते. वैशाली खानोलकर हिला यावर्षी राज्याचा आदर्श पत्रकार पुरस्कार ,उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार असे दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने यांचा सत्कार करण्यात आला.राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातुन तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page