✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

कोकणचे सुपुत्र तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या महानाट्याला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.आज रविवारीही म्हणजेच तिसऱ्या दिवशी”शिवगर्जना” या महानाट्याचा शेवटचा दिवस आहे.तर आजही होणार तुफान गर्दी होणार आहे.शिवगर्जना’च्या अभूतपूर्व यशानंतर आता भव्य-दिव्य ‘सिंधु महोत्सव’.;विशाल परब यांची मोठी घोषणा विशाल परब यांनी केली आहे.यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची पर्वणी “सिंधु महोत्सवातही अनुभवण्यास मिळणार आहे.

आदरणीय नारायण राणे साहेबांचे राजकीय जीवन मी लहानपणापासून पाहत आलोय. दादा मुख्यमंत्री असताना मी बारा वर्षाचा होतो. मी लहानपणापासून दादांचा अतिशय मोठा फॅन आहे. त्यांचा संघर्ष मी बघत आलोय. त्यांच्यात प्रेरणेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य दिव्य असा ‘सिंधु महोत्सव’ लवकर मी घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना आगळीवेगळी पर्वणी देण्याचा माझा मनोदय आहे, अशी मोठी घोषणा भाजपचे युवा नेते आणि प्रसिद्ध उद्योजक विशाल परब यांनी केली.

विशाल परब पुढे बोलताना म्हणाले की, हा “सिंधु महोत्सव” २०२३-२४ असा भव्यदिव्य असेल की ज्याची कल्पना कोणी करू शकणार नाही. तर या सिंधु महोत्सवात मत्स्य महोत्सव सुद्धा होणार आहे. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सुद्धा कीर्तन असणार आहे. मला जशी तुम्ही साथ दिली तशीच साथ यापुढे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना देत रहा. मी सदैव तुमचा ऋणी राहीन, असे सांगत उपस्थित नाट्यप्रेमींना आवाहन केलं.यावेळी विशाल परब यांच्या सौभाग्यवती सौ. वेदिका विशाल परब, मुलगी भार्गवी, विशाल परब, मुलगा विराज विशाल परब,अशोक सावंत, दादा साईल, प्रकाश मोर्ये, दिपक नारकर, मोहन सावंत आदी भाजपचे व विशाल सेवा फाऊंडेशन कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page