कुडाळ /-
पावशी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेला युवक बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली.अभिषेक सिताराम दळवी (२१) ,रा.पावशी-भटवाडी,असे त्यांचे नाव आहे. दरम्यान त्याचा शोध घेण्याचे काम चालू असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.
याबाबतची माहिती कुडाळ पोलिस ठाण्याचे अंमलदार पंढरीनाथ भांगरे यांनी दिली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत धरण परिसरात पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.