कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज सोमवारी कोरोना बाधित झालेले ३४ रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण तर तालुक्यात आतापर्यंत ८२५ रुग्ण सापडले आहेत. कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ३४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून कुडाळ ५, कवठी १ ओरोस ९, आंब्रड १, नेरूर कर्याद नारूर १, पिंगुळी १, माणगांव १, गुढीपूर १, पावशी ३, रानबांबुळी १, कसाल १, पणदूर १, घोटगे १, ढोलकरगांव ५ असे रुग्ण आढळून आले आहेत.
तसेच तालुक्यात ३०० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २२२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ७८ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page