मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- मालवण.

मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या भव्य स्वरूपातील डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मालवण धुरीवाडा येथील टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे दि. १५ ते १९ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ दि. १५ रोजी मालवण शहरातून भव्य अशी मोटारसायकल रॅली काढून होणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.

मालवण येथील शिवसेना ठाकरे गट शाखा कार्यालयात हरी खोबरेकर यांनी भगवा चषक क्रिकेट स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी शहर प्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, महिला आघाडी तालुका संघटक पूनम चव्हाण, युवती सेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेतर, नरेश हुले, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, किशोर गावकर, अक्षय रेवंडकर, अक्षय वालावलकर, अंबाजी सावंत, दत्ता पोईपकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक व ३ लाख, उपविजेता संघास भव्य चषक व १ लाख ५० हजार व वैयक्तिक स्तरावरील अन्य पारितोषिके असणार आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजन होणार आहे. बुधवार १५ मार्च रोजी सायं. ४ वा. भगवा चषक २०२३ ची भव्य मोटारसायकल रॅली देऊळवाडा – भरड ते बाजारपेठ मार्गे बंदर जेटी फोवकांडा पिंपळ ते बोर्डींग मैदान अशी काढण्यात येणार आहे, असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा व शुभारंभाचा सामना बुधवार १५ मार्च रोजी सायं. ६ वा. संपन्न होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार वैभव नाईक, प्रमुख उपस्थिती म्हणून उपनेते अरूण दुधवडकर, गुरुनाथ खोत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सतिश सावंत, अतूल रावराणे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, सुशांत नाईक, मंदार शिरसाट, साक्षी प्रभु आदी पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही खोबरेकर यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळ्यास तसेच सर्व क्रिकेट सामन्यांना क्रिकेटप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद लुटावा, असे आवाहन यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केले. या स्पर्धे दरम्यान प्रेक्षकांसाठी व्हीआयपी बैठक व्यवस्था असणार आहे. बैठक व्यवस्थेची शुल्क भरणा नोंदणी केल्यानंतर त्या प्रेक्षकांची खुर्ची व स्वरूपात आरक्षित करून ठेवली जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मंदार केणी- 9370639960, 9637778901 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही हरी खोबरेकर यांनी केले.

स्पर्धेचे वेळापत्रक :- १५ मार्च – गुड मॉर्निंग मालवण विरुद्ध रोहन करंजेकर- पुणे, ओम स्पोर्ट्स म्हापण विरुद्ध रोहित स्पोर्ट्स, wcc बागायत विरुद्ध धाडसकळ विरुद्ध सिंधुदुर्ग पोलीस, माऊली युवक क्रीडा मंडळ – गोवा विरुद्ध सिटी बॉईज, १६ मार्च – ब्राह्मणदेव बागायत विरुद्ध सागर किनारा दांडी, स्वप्नील इलेव्हन विरुद्ध राजाराम वॉरियर्स ब २, JCB कुडाळ विरुद्ध दांडी बॉईज, RV देवबाग विरुद्ध गुडमॉर्निंग ब, १७ मार्च- – कासार्डे विरुद्ध ऑरेंज आर्मी, रणझुंजार वैभववाडी विरुद्ध सिंधुदुर्ग पोलीस, उमेश इलेव्हन विरुद्ध दशावतारी योद्धा, PG स्पोर्ट्स विरुद्ध महापुरुष स्पोर्ट्स, १८ मार्च – वेताळ मुंजेश्वर विरुद्ध कीर्ती स्पोर्ट्स, दानिश इलेव्हन विरुद्ध शांतादुर्गा वॉरियर्स, अमराज मृत्युंजय पुणे विरुद्ध ध्रुव पार्से गोवा, राजाराम वॉरियर्स अ विरुद्ध SSCC डोंबिवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page