✍🏼लोकसंवाद /-वैभववाडी.

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत स्टॉल हटविल्यानंतर स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाच्या उभ्या असलेल्या प्रश्नावर कोणताच ठोस निर्णय न झाल्याने गरीब व गरजू स्टॉल धारकांची मोठी कोंडी झाली.कुटुंबाचा उदरनिर्वाह पुर्णतः स्टॉल वरील व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांनी ८ मार्च जागतिक महीला दिनानिमत्ताने पुन्हा उपोषण सुरू केले.

या वेळी नगरसेवक राजन तांबे यांनी उपोषण स्थळी भेट दिली.आपण आपल्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहोत तरी आपण काही काळ आम्हाला सहकार्य करावे असे आश्वासन देऊन महीला स्टॉलधारकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र स्टॉल धारक, नगरपंचायत प्रशासन व आमदार नितेश राणे यांच्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे आपण आमच्या पुनर्वसनासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था न करता जेसीबी च्या सहाय्याने स्टॉल हटविण्यास सुरवात केली मात्र आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही.त्यामुळे एकदा झालेली चुक आम्ही पुन्हा होवू देणार नाही.जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत आमचे उपोषण थांबणार नाही असे उपोषणकर्त्या महीलांनी स्पष्टच सांगितले.

चर्चेच्या निमित्ताने आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना स्टॉल धारकांनी आपला व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबाची होणारी आर्थिक कुचंबणा परिणामी घरातील इतर व्यक्तिचे आजारपण, शिक्षण या सर्वांवर होत असलेल परिणाम आपल्या व्यथा पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न केला.आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिले पण तुम्ही सर्व नगरसेवकांनी एकमताने ठराव मांडून आमचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आमचे स्टॉल हटवून आमची आर्थिक कोंडी केली.अशी उद्विग्न प्रतिक्रिया उपोषणकर्त्या स्टॉल धारकांनी व्यक्त केली.बांधकाम सभापती विवेक रावराणे व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी उपोषणकर्त्या महीलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आता पर्यायी जागेची लेखी हमी दिल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असे उपोषणकर्त्या महीलांनी ठणकावून सांगितले.यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर,उपनगराध्यक्ष संजय सावंत, बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक राजन तांबे, पोलिस निरीक्षक अमीत यादव व सहकारी तसेच स्टॉल धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page