सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) जनसुनावणी दि.28.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजलेपासुन सुरु करण्यात आली होती.आज सुनावणीदरम्यातन तांत्रिक कारणांमुळे काही लोक प्रतिनीधींना आपले म्हचणणे मांडता आले नाही. नैसर्गिक न्यातयाच्या तत्वानुसार संबंधीतांना आपले म्हेणणे मांडणेची पर्याप्त संधी मिळावी या करिता सदरची जनसुनावणी कायम करत दिनांक 30.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑनलाईन जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत आहे.या जनसुनावणीसाठी लोकप्रतिनीधींना पंचायत समिती कार्यालय सभागृह देवगड, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथे उपस्थित राहुन आपले म्हणणे मांडता येईल.