✍🏼लोकसंवाद /- ओरोस.
कसाल दशक्रोशीतील गरीब व गरजू रुग्णांचा देव म्हणून गेले कित्येक वर्ष कार्यरत असलेले डॉक्टर प्रवीण हरिशचंद्र सानेकर वय वर्ष ५८ यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले मुळ चेंदवण तालुका कुडाळ येथील डॉक्टर प्रवीण सानेकर हे कसाल मध्ये गेली कित्येक वर्ष रुग्णसेवा देत होते.कसाल दशक्रोशीतील गोरगरिबांचा अल्प दरात सेवा देणारे डॉक्टर म्हणून ते परिचित होते. त्यामुळे गरीब व गरजूंचा देव म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते. शुक्रवारी सकाळी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या दवाखान्यात रुग्णांची सेवा सुरू केली. दरम्यान रुग्ण तपासणी करत असताना अचानक यांना हयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले उपस्थित रुग्णांनी लगत असलेले डॉक्टर पवार यांना प्राचारण केले मात्र तोपर्यंत डॉक्टर सानेकर यांची प्राणज्योत मावळली होती. डॉक्टर प्रवीण सानेकर यांच्या निधनाची माहिती मिळतात दशक्रोशीतील नागरिकांनी यांच्या दवाखान्याकडे धाव घेतली. डॉक्टर प्रवीण सानेकर यांच्या पश्चात भाऊ वहिनी असा परिवार आहे.
