✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.

शिरोडा बाजारपेठेत आगीत जळून नुकसान झालेल्या दुकानांना आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्या नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात आली.या अग्नितांडवात नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करून संबंधित व्यापाऱ्यांना पुन्हा नव्याने आपला व्यवसाय उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्वरित मदत करण्यात आली. हि मदत शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, माजी आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादी उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी उपसभापती सिद्धेश परब, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रा. पं सदस्य मयुरेश शिरोडकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page