सावंतवाडी /-
सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना 26 हजार 132 मराठ समाजाचे सह्यांचे निवेदन देण्यात आले. आमच्या मागण्या शासन दरबारी पोहचवा अशी विनंती यावेळी समाजाच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ती मान्य करून आपले हे निवेदन शासन दरबारी पोहोचवू असे आश्वासन दिले.सिंधुदुर्ग जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यात एकाच वेळी सर्व तालुक्यांमध्ये आज तहसीलदार यांना मराठा समाजाच्या वतीने सह्यांचे निवेदन देण्याचे निश्चित करण्यात आले होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे एक लाख सह्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
सावंतवाडी तालुक्याने पंचवीस हजार सह्यांचे चे उद्दिष्ट ठेवले होते मात्र हे उद्दिष्ट पार करत २६ हजार १३२ मराठा समाज बांधवांनी निवेदनावर सह्या करून उच्चांक गाठला त्यात बांदा विभागाने दहा हजार तीस तर सावंतवाडी विभागाने १६१०२ सह्यांचे निवेदन जमा झालीत ती एकत्रित करण्यात आलीत.
सुरुवातीला मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या रास्त मागण्या शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण कायम राहिले तरच मराठा समाजातील मुले भविष्यात पुढे जाऊ शकतात त्यासाठी संघटित होऊन दबावतंत्राचा वापर करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करून गाव तिथे मराठा संघाची शाखा असे धोरण अवलंबणार असल्याचे सांगितले,तर अभिलाष देसाई यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना बहुसंख्य मराठा समाज असताना त्याचे प्राबल्य कुठे तरी कमी होताना दिसत आहे सध्या तो निद्रिस्त आहे त्याला जागे करण्याचे काम आहे. कुठेतरी मराठा समाजाचे प्राबल्य कमी होते की काय असे वाटू लागले आहे त्यामुळे संघटीत होणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी मराठा समाजाने केलेल्या मागण्या बहुतांशी शासनाने मंजूर केले आहेत राहिलेल्या ही मागण्या लवकरच शासन मंजूर करेल असा विश्वास व्यक्त करून मराठा समाजाची वज्रमूठ कायम ठेवावी असे आवाहन केले. त्यानंतर सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे बांदा अध्यक्ष बाळू सावंत. उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक सचिव आकाश मिसाळ निलेश मोरजकर, राकेश परब, ज्ञानेश्वर सावंत, नगरसेवक बाबू कुडतरकर, प्राध्यापक सतीश बागवे ,चंद्रकांत राणे ,पुंडलिक दळवी .सखाराम जामदार ,अभिमन्यू लोंढे, उमेश सावंत, दिगंबर नाईक, जीवन लाड, विष्णू सावंत, अजय सावंत ,प्रशांत मोरजकर, सुशील आमुणेकर, शैलेश गवस,दिनेश गवस, शाम सावंत, संजय भाईप,मधू देसाई, सुर्या पालव, नितीन राऊळ, अजय कोठावळे, विलास पावसकर, यशवंत आमोणेकर,राघो परब, त्रिविक्रम सावंत, प्रभाकर गावडे ,सचिन सचिन बिरोडकर आदी उपस्थित होते.