✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गच्यावतीने भंडारी समाजासाठी वेंगुर्ले कॅम्प मैदानावर आयोजीत केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक 2023 या भव्य बक्षिसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील सावंतवाडी अ, सावंतवाडी ब, कुडाळ अ, कुडाळ ब, दोडामार्ग, मालवण अ, मालवण, वेंगुर्ले अ, वेंगुर्ले ब असे जिल्ह्यातून 9 संघ सहभागी झाले होते.
उपउपांत्य फेरीचा पहिला सामना मालवण ब संघ विरूध्द वेंगुर्ले संघ यांच्यात झाला. यात मालवण ब संघाने नाणे फेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. या सामन्यात वेंगुर्ले संघाने उत्कृष्ट फलदांजी करत 85 धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल खेळलेल्या मालवण ब संघास ‘ वेंगुर्ले संघाच्या गोलदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 6 गडी बाद करत 50 धावातच मालवण संघास गारद केले. त्यामुळे वेंगुर्ले संघ 30 धावांनी विजयी होत उपांत्य फेरी दाखल झाला. उपउपांत्य फेरीचा दुसरा सामना मालवण अ’ विरूध्द कुडाळ अ संघ यांच्यात झाला. या सामन्यात मालवण अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कुडाळ अ संघाने 87 धावा केल्या.यात कुडाळ संघाच्या सुरज करलकर याने वैयक्तीक 51 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळलेल्या मालवण अ संघास उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 70 धावावर कुडाळ संघाने रोखले. त्यामुळे 17 धावांनी विजयी होत कुडाळ अ संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.
या स्पर्धेचा अंतिम सामना वेंगुर्ले ब संघ व कुडाळ अ संघात झाला. या सामन्यात वेंगुर्ले संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत 51 धावा केल्या. या वेंगुर्लेच्या राधा पेडणेकर यांनी 18 तर तेजस जुवलेकर यांनी 17 धावा केल्या. प्रत्त्युत्तरादाखल खेळलेल्या कुडाळ संघास, वेंगुर्ले संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ फलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 34 धावावर रोखले. त्यामुळे 17 धावांनी वेंगुर्ले ब संघ विजेता ठरला असून रोख रु. 21 हजार व चषकाचा मानकरी ठरला. तर कुडाळ ब संघास उपविजेते पदाच्या रोख रु. 15 हजार व चषकांवर समाधान मानावे लागले.. या स्पर्धेत सामनावीर सुरेश मांजेरकर, मालिकावीर, सुरज करलकर,
(कुडाळ संघ), उत्कृष्ट गोलंदाज संतोष शेटकर (कुडाळ), उत्कृष्ट फलंदाज,राजन केरकर (वेंगुर्ले), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साईल वेंगुर्लेकर (कुडाळ ब) व उत्कृष्ट यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर (वेंगुर्ले ब संघ) यांना महासंघाच्यावतीने चषक देवून सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुधीर सारंग, बबी कानडे, प्रमाद भोवर, उदय म्हाडदळकर यांनी, समालोचक म्हणून संतोष मर्ये, मंथन परब, ऋतुराज खाजणेकर, गुणलेखक म्हणून विशाल मर्ये, ओंकार मर्ये, यशवंत किनळेकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे उदघाटन व बक्षिस वितरण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेचे अध्यक्ष अँड. श्याम गोडकर, सरचिटणीस प्रा. डॉ. आनंद बांदेकर, जिल्हा सरचिटणीस विकास वैद्य, क्रिकेट समिती प्रमुख बाबली वायंगणकर,शेखर गवंडे ,समील जळवी , जयराम वायंगणकर, राजू गवंडे, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. संजय खडपकर, समील जळवी, जयप्रकाश चमणकर, दिपक कोचरेकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, सुनील नाईक, लक्ष्मीकांत मुंडये, दादा वराडकर, गजानन गोलतकर, श्रेया मांजरेकर, अंकिता बांदेकर, सदानंद केरकर, भरत आवळे, बाळ चोडणकर, चंद्रकांत वाडकर, अशोक नाईक, संतोष वैद्य, सत्यवान साटेलकर, विलास मांजरेकर, जया चुडनाईक, सुधीर सारंग, उदय म्हाडदळकर, गवंडे, प्रमोद भोवर, बबी कानडे, रामेश्वरी गवंडे, यशवंत किनळेकर, सुजीत चमणकर, निलेश गोवेकर, मनोहर पालयेकर, कमलाकांत नवार यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.