एकनाथ शिंदेंच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याने कणकवलीत भाजपकडून जल्लोष साजरा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

बाळासाहेब ठाकरे हे आज जिथे असतील त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. त्यांच्या मुलगा व नातवाने जे त्यांचं नाव धुळीस मिळवायचा काम केलं त्या दोघांना देखील ही आज चपराक बसली असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला. तसेच यावेळी श्री. राणे यांनी इलाका भी हमारा और धमाका भी हमारा असे सांगत शिवसेनेच्या त्या टॅग लाईनला उत्तर दिले. तसेच जल्लोष करताना सुरुवातीलाच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर मिश्किल हसून टोला देखील लगावला.

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची युती असताना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर योगायोगाने आजच या पटवर्धन चौकात खासदार संजय राऊत यांची कॉर्नर सभा झाली त्याच पटवर्धन चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, शिशिर परुळेकर, विराज भोसले, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, वरवडे माजी उपसरपंच आनंद घाडीगांवकर, अचित कदम, सुभाष मालंडकर, प्रज्वल वर्दम, बबलू सावंत, अजय गांगण, बाबू गायकवाड, किशोर राणे, तेजस लोकरे, राजा पाटकर, विजय चिंदरकर, यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page