✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

आंबोली वनपरिक्षेत्रांचे वनअधिकारी व वनकर्मचारी यांना नानापाणी रस्त्यांच्या बाजुला आठ ते दहा दिवसाचे माकडाचे पिल्लू असल्याचे मानद वन्यजीव रक्षक महादेव भिसे यांनी दूरध्वनी वरुन वन विभागास कळविले. तातडीने माकडाचे पिल्लू वन कार्यालयात आणून त्याला दूध पाजून प्राथमिक उपचार केले.वन विभागाच्या वतीने रेस्कू करुन पिल्लाच्या आईचा शोध घेतला आणि त्यांच्या आईशी पिल्लाची भेट घडवून आणली.

दिनांक 24 रोजी रत्याच्याकडेला पिल्लू असल्याचे महादेव भिसे मानद वन्यजीव रक्षक यांनी कळविले.सदरचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेवून यांनी त्या माकडाच्या पिल्ल्याच्या आईचा शोध घेतला पण ती दिसून आली नाही. थोड्यावेळानंतर 1 माकड मादी आवाज करत आंबोली वनपरिक्षेत्राच्या कार्यालयाच्या परिसरात आली. उपस्थित वनअधिकारी यांना समजले की, याच पिल्लाची ती आई असल्याची खात्री झाली. त्या पिल्लाला कार्यालयाच्या आवारात झाडाखाली ठेवले तेव्हा तेही आपल्या आईला पाहून ओरडायला लागले. लगेचच त्यांची आई येवून त्या पिल्लाला आपल्या कुशीत घेवून ती अधिवासात निघून गेली. या कार्यात वनक्षेत्रापाल आंबोली व वनकर्मचारी यांनी सदरचे बचाव कार्य हे यशस्वीपणे पार पाडले. अशी आंबोलीचे वनक्षेत्रपाल वि.अ. घोडके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page