सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष श्री. विनायक राणे व श्री. ओंकार तेली यांनी यशस्वीपणे हाताळला होता. लोकांना न्याय देवू शकले होते. मात्र सद्याच्या सत्ताधारांच्या एका वर्षामध्ये कारभाराचा जनप्रक्षोभ हा २६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’ या दिवशी ५ ते ६ उपोषणातून दिसून येत आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या सत्ताधारी व प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात एवढया मोठया प्रमाणावर उपोषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नगरपंचायतीचा कारभार सत्ताधा-यांकडून वेशीवर टांगला गेला आहे. असे स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या कारभारा विरोधात शहरातील ५ ते ६ जणांचे उपोषणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये बांधाकाम विभागाच्या विरोधात ४ तर आरोग्य विभागाच्या व नळपाणी योजनेच्या विरोधात प्रत्येकी १ असे सहा अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शुभम शांती अपार्टमेंट हे काँग्रेच्या पदाधिका-याचे असल्यामुळे कारवाई होवू शकत नाही.शुभम शांती अपार्टमेंटला निवासी संकूल म्हणून परवानगी देण्यात आली होती. पण त्यामध्ये वाणिज्य वापर होवू लागला, तसेच सदरील अपार्टंमेटचे सांडपाणी हे लगच्या जडये व काष्टे यांच्या विहीरी लगत सोडून दिले आहे. सदरील सांडपाण्यामुळे विहीरीचे पाणी दुषीत होवून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर तेथील २५ ते ३० रहिवाश्यांनी कारवाई करण्यात यावी अशीत मागणी केली.त्या बिल्डरला दोन नोटीसा पाठवून कारवाईचा फार्स दाखविण्यात आला. व आजतगायत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या बिल्डरच्या पाठीशी सत्ताधारी व प्रशासन ठामपणे असल्यामुळे ३० ते ३५ लोकांना उपोषण बसण्याची वेळ आली ही खरोखर शहरासाठी शोकांतीका आहे. ग्रामपंचायत कालावधी पासून गेल्या ५ वर्षाच्या नगरपंचायतीच्या कालावधीत रेकाॅर्ड ब्रेक उपोषणे झाली नव्हती. सद्याच्या सत्ताधा-यांना शहराच्या विकासापेक्षा स्वतःच्या विकासावर व प्रगतीवर भर दिला आहे.सत्ताधा-यांनी नगरपंचायत हे पैसे कमविण्याचा साधन बनविले आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना शहराच्या विकासाशी काहीही देणे-घेणे नाही आहे. फक्त स्वतःचे तुंबडी भरण्यासाठी सत्ता हवी होती हे त्यांनी एक वर्षामध्ये दाखवून दिले आहे.

शहरात सांडपाण्याचे मोठयाप्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्ताधारी व प्रशासन गप्प डोळे मिटून बसले आहेत. त्यांना लोकांच्या आरोग्याशी काहीही देणे-घेणे नाही. आपल्या मर्जीतील माणासांना ठेके वाटून देणे यात ते मशगुल आहेत. आरोग्य सभापतींना लोकांच्या आरोग्याशी काहीही देणे-घेणे नाही आहे. त्यांना सांडपाण्याच्या कारवाईबाबात विचारले असता ते म्हणतात आम्ही फक्त नोटीस पाठवू शकतो तर कारवाई करायची कोणी? नोटीसी पाठविली की आर्थिक उद्देश सफल होतो, मग कारवाई होत नाही.

स्वच्छता निरिक्षक व नगरपंचायत अभियंता यांमध्ये विस्तव जात नसल्याने कुरघोडीचे राजकारण चालू आहे. या लोकांचा हकनाक बळी जात आहे. स्वच्छता निरिक्षक श्री. संदीप कोरगांवकर यांची लोकांशी अरेरावी, उध्दट भाषा व नगरसेवकांची दिशाभूल करणे हे वाढत चालले आहे. त्यामुळे, कुडाळचे आरोग्य सांडपाणी अशा तक्रारींना बाबत कारवाई होण्याच्या आशा धुसर झाले आहे. त्यामुळे उपोषणाचे मार्ग स्विकारले जात. आहेत. तरी होणा-या सर्व उपोषणकर्यांच्या आम्ही भाजपचे सर्व नगरसेवक पाठीशी आहोत व न्याय मिळेपर्यंत पाठीशी भक्कम पणे उभे राहणार असे प्रसिद्धी पत्रकात स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page