✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
मारहाण करुन जखमी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.जखमी केलेचे आरोपातून अणाव ता. कुडाळ येथील प्रशांत दत्तात्रय परब त्यांची पत्नी सौ. प्राची न्यायदंडाधिकारी श्री. ए. एम. फडतरे
यांनी निर्दोष केली.जमिनीच्या वादातुन शेजारी राहणा-या व्यक्ती व त्याची पत्नी या दोघांनाही मारहाण करुन प्रशांत परब मुलगा प्रतिक प्रशांत परब यांची ओरोस सिंधुदुर्ग येथील में मुख्य मुक्तता आरोपी यांचेवतीने अॅड. यतिश खानोलकर यांनी कामकाज पाहीले.त्यांना अॅड. रोहीत उर्फ तानाजी पालव व अॅड. कोमल काकतकर यांनी सहाय्य केले.
प्रस्तुतची घटना दिनांक11/11/2020 रोजी घडलेली होती.यातील आरोपी व फिर्यादी सुनिल परब यांच्या शेतजमिनी लगत असुन त्या कारणाने त्यांचे वाद सुरु होते. या वादाचे कारणातुन आरोपी यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी शिवीगाळ केली होती व ठार मारणेची धमकी दिली होती तसेच त्यांना लाथबुक्यांनी मारहाण करुन त्यांना जखमी केले होते, अशा आशयाची फिर्याद सुनिल परब यांनी दिनांक 12/11/2020 रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्थानकात दिलेली होती.
त्यानुसार या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीसांनी सर्व आरोपी यांचेविरुदध भा.द.वि.कलम325,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन व तदंनतर तपासकाम करुन सदर कलमाखालीच आरोपी यांचेविरुदध ओरोस येथील मे. मुख्य न्यायंदडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सदर खटल्याची ओरोस येथील में मुख्य न्यायंदडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली.सदर सुनावणीत आरोपी यांचेविरुदध कोणताही सबळ पुरावा न आढळुन आल्याने आरोपीचे वकीलांनी मांडलेला बचाव ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.