तर,सचिवपदी रोहन पारकर व उपाध्यक्षपदी” मयुर ठाकूर नियुक्ती..
जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली निवड..
🛑लोकसंवाद /- कणकवली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील आज कणकवली पंचायत समिती येथील पत्रकार कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी,जिल्हा सचिव शिरीष नाईक,जिल्हा खजिनदार सौ.संजना हळदिवे,जिल्हा सहखजिनदार संजय भाईप,जिल्हा सदस्य मिलिंद धुरी,जिल्हा सदस्य आनंद कांडरकर आदि सदस्य तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्ष”पदी” झी 24 तासचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी उमेश परब यांची नियुक्ती केली.तर सचिव”पदी” पत्रकार रोहन पारकर यांची नियुक्ती केली.तर उपाध्यक्ष”पदी”पत्रकार मयुर ठाकूर यांची यावेळी नियुक्ती केली.तर पत्रकार विराज गोसावी, खजिनदार पदी जेष्ठ पत्रकार आनंद तांबे यांचीही यावेळी नियुक्ती केली.