लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ पंचायत समिती ही  नेहमीच विविध शासकीय,नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये कोंकण,राज्य पातळीवर अव्वल ठरली आहे आता तर या पंचायत समितीने  कुडाळ तालुक्यात 74 गावात एकाच दिवशी हागंणदारीमुक्त अधिक (ओडीएफ ++)  प्रकल्प राबविण्याचा उपक्रम राज्यात सर्वप्रथम हाती घेतला असून 31 मार्च 2023 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.पणदूर येथील संविता आश्रम येथे उद्या 13 जानेवारीला सकाळी 10 वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे122 महसूल गांवापैकी यापूर्वीच 48 गावें हागंणदारीमुक्त अधिक झाली आहेत.
  
कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे सर्व विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास नेहमीच राज्यपातळीवर अग्रेसर ठरले आहे.यशवंतपंचायतराज अभियान,महाआवास अभियान ,बाबू लागवड,स्वच्छता अभियान,स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, विधवा प्रथा बंद,पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम आदी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले हे सर्व उपक्रम जिल्ह्यासह कोंकण राज्यासाठी आदर्शवत ठरले आहेत  आता तर  कुडाळ तालुक्यात 74 गावात एकाच दिवशी हागंणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस प्लस)  प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून 31 मार्च 2023 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

श्री चव्हाण म्हणाले स्वच्छ भारत मिशन  ग्रामीण अंतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने उद्या 13 जानेवारीला सार्वजनिक कंपोष्ट खड्डा व शोषखड्डा दिन एकाच वेळी बांधण्याचा संकल्प असून हा संकल्प राबविणारी कुडाळ समिती राज्यात पहिली ठरणार आहे स्वच्छ भारतमिशन अंतर्गत कुडाळ   तालुक्यातील एकूण 68 ग्रामपंचायतकडील 122   महसुल गावे ही हांगणदारीमुक्त (ODF) झालेली असून 28ग्रामपंचायतीकडील 29महसूल गांवे ही हांगणदारीमुक्त अधिक  (ODF’) झालेली आहेत.शिल्लक 40ग्रामपंचायतीकडील 74 महसूलगावे ही हागणदारीमुक्त अधिक (Odf++) करावयाची  असुन त्याचाच एक भाग म्हणून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत  तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीकडील 65 महसुल गावामध्ये शोष खड्डा/खत खडा/ लिजपिट/ बांधीव खतखड्डा बांधण्यात येणार आहे पंचायत समिती कुडाळने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा उच्चांक गाठला असून तालुक्यात 49 ग्रामपंचायतीकडील 65 महसुल गावांमध्ये  79 सार्वजनिक शोष खड्डे,104 सार्वजनिक खतखड्डे, 15 नडिपखड्डे,14 लिजपीठ व 4 गांडूळखत युनिट बांधून एकाचवेळी बांधून पूर्ण करण्याचा संकल्प केला.

उद्या 13 जानेवारीला पणदूर येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर ,विशाल तनपुरे,उपमुख्यकार्यकरी अधिकारी पाणीपुरवठा विभाग  विनायक ठाकूर गटविकास अधिकारी विजय चव्हाण सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब  पणदूर सरपंच  श्रीम. पल्लवी पणदूरकर उपसरपंच साबाजी मसके, ग्रामसेविका सपना मसगे सदस्य, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे या उपक्रमासाठी विस्तार अधिकारी नेमले आहेत सांडपाणी घनकचरा नियोजन प्लास्टिक गोळा करणे व विलगीकरण करणे हा महत्त्वाचा उपक्रम आहे मागील वर्षी या अभियानात पश्चिम महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हापरिषद राज्यात दुसरी आली होती हा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व विनायक ठाकूर यांनी दिल्ली येथे स्वीकारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page