वेंगुर्ला /-
वेंगुर्ला शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्वरित बंदोबस्त करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वेंगुर्ले तालुका शहर शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या वेंगुर्ला शहरात रात्रीच्या वेळी टू व्हीलर, फोर व्हीलर भांडी व इतर वस्तूंची चोरी करण्याचे प्रमाण सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले आहेत. सध्या आठवडा बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असला तरी रात्रीच्या वेळी पावसाळी वातावरणामुळे व सततचा वीजप्रवाह खंडित झाल्याने याचा फायदा घेऊन टू व्हीलर, फोर व्हीलर भांडी यांच्या गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. यासाठी आपल्या कार्यालयामार्फत रात्री पोलिसांची गस्त वाढवून रात्री १० ते पहाटे ५ या कालावधीत चोख पोलिस बंदोबस्त ठेवून चोरांचा बंदोबस्त करून शहरवासीयांच्या मालमत्तेचे रक्षण करावे, अन्यथा वेंगुर्ला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यामार्फत रस्त्यावर उतरून स्वतः गस्त घालून चोरांचा बंदोबस्त केला जाईल.तरी त्वरित कार्यवाही करावी.
यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ,शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, सचिन वालावलकर,शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर,उपशहरप्रमुख उमेश येरम, शाखाप्रमुख गजानन गोलतकर, डेलीन डिसोझा, हेमंत मलबारी, संदीप केळजी, आंनद बटा,सुनिल वालावलकर,सुहास मेस्त्री,प्रितम सावंत,राकेश मुंडये,अभिनय मांजरेकर आदी उपस्थित होते.