▪️परुळे /-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (८ वी) परीक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, तालुका वेंगुर्ले या प्रशालेने यश संपादन केले आहे. प्रशालेच्या अर्पिता अमेय सामंत या विद्यार्थिनीने राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दहावा क्रमांक पटकावला. तिने २२० (७३.८२%) गुण प्राप्त केले.याबरोबरच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) परीक्षेमध्ये कौस्तुभ रुपेश राणे, रंजना विनोद राणे, वरद सुमन राणे व सोहम गंगाराम पवार हे चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देसाई, संस्था उपाध्यक्ष डॉक्टर उमाकांत सामंत, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ यांनी या यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.