नेरूर जि प विभाग बालेकिल्ल्याला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पाडले खिंडार..
कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने खिंडार पाडले असून नेरूर गावातील शेकडो प्रमुख शिवसैनिकानी जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे आगामी जि.प. आणि पं स निवडणुकांच्या तोंडावर आमदार वैभव नाईक यांना धक्का मानला जात आहे. तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या मेहनतीने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख आग्रे म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना हा राज्यातील सत्तेतील पक्ष आहे. मुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री सामंत आणि शिक्षणमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून नेरूर जिल्हा परिषदेतील विकासकामांना न्याय दिला जाईल. पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे समाधान होईल असे काम केले जाईल. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, महिला जिल्हा उपसंघटक नीलम शिंदे, तालुका महिला संघटक अनघा रांगणेकर, गडकरी आदी उपस्थित होते.