लोकसंवाद /- मालवण.
सिंधुरत्न समिती सदस्य तथा उद्योजक किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमिटी 7 जानेवारी रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, मालवण तालुकाप्रमुख विश्वास गावकर यांच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 7 जानेवारी रोजी किरण सामंत यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे अभिषेक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी मठ येथे चोळप्पांचे पाचवे वंशज नितीन गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येणार आहे. मालवण देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत फळवाटप आदी धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.