लोकसंवाद /- कुडाळ.
माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या निलंबनाचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्याचे निश्चित केले असून त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी तालुका स्तरावर राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली,
मुख्यमंत्र्यांचा भुखंडाचा श्रीखंड
वितळला आणि जनते पर्यंत पसरला तो सावरण्यासाठीच आमदार जयंतराव पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन राज्य सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्न हा शिंदेंना भ्रष्टाचारातून वाचवण्याचा रडीचा डाव आहे,फडणवीस सरकारने भ्रष्टाचारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भूखंडाच्या प्रकरणात वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रात जात असलेली राज्य सरकारची इभ्रत वाचवण्यासाठीच असले घाणेरडे प्रकार हूकुमशाहीच्या माध्यमातून लोकशाही आणि विरोधी पक्ष संपवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपने आखलेला हा कुटील डाव आहे,याचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर निषेध व्यक्त करत असून, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सोबत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्ट केले, यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री अमित सामंत,प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर,जिल्हा सरचिटणीस भास्कर परब,बाळ कनयाळकर,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक,तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे,सहकार सेल जिल्हाध्यक्ष उत्तम सराफदार, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष श्री नझीरभाई शेख,अनिल कानडे, आनंद आकेरकर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.