नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आगळीवेगळी स्पर्धा..

लोकसंवाद /- कणकवली.

दरवर्षी कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन महोत्सवात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा भरणा असतानाच यावर्षी कणकवली नगरपंचायतच्यावतीने पर्यटन महोत्सव 2023 च्या निमित्ताने इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत कणकवलीकरांना एक नवीन व्यासपीठ नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आले आहे.

इंस्टाग्राम रिल्स स्पर्धा ही कणकवली पर्यटन महोत्सव 2023 शी निगडित असणार आहे व शहराच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक, यासह खाद्य संस्कृती यावर आधारित असावी. या स्पर्धेकरिता स्पर्धकांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करायच्या रिल्स (व्हिडिओ) हे जास्तीत जास्त एक मिनिटापर्यंतचे असावेत. त्यापेक्षा मोठे असू नयेत. तसेच हे (व्हिडिओ) रील 22 डिसेंबर 2022 ते 6 जानेवारी 2023 पर्यंतच इंस्टाग्रामच्या कणकवली नगरपंचायत पर्यटन महोत्सव 2023 च्या पेजवर पोस्ट करायचे आहेत. त्यानंतर येणाऱ्या रिल्स (व्हिडीओ) या स्पर्धेकरता ग्राह्य धरले जाणार नाहीत. कणकवली शहर मर्यादित ही स्पर्धा असणार असून, कणकवली शहरातील उत्कृष्ट रिल्स बनवणाऱ्या पाच स्पर्धकांची व त्यांच्या रिल्सची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे. या स्पर्धकांना पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट 5 रिल्स या कार्यक्रमस्थळी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या पेजवर आक्षेपार्ह कोणत्याही रिल्स (व्हिडीओ) पोस्ट करण्यात येऊ नयेत. त्या रील या स्पर्धेकरता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. या पेजवर रिल्स पोस्ट करत असते वेळी पुढील प्रमाणे युजरनेम टॅग करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page