✍🏼लोकसंवाद /-कुडाळ.

सिमावाद गेले अनेक वर्षे सुरुग असुन,मराठी भाषिकांवर कानडी अन्याय करत आहेत.आज महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावासिंय मराठी भाषीकांना भेटण्यासही विरोध केला गेला आहे.तसेच आज महाराष्ट्र पासिंग गाड्या कर्नाटक वेदीरक्षा पक्षाच्या गुंडानी कर्नाटकात फोडल्या..महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ च्या गाड्या कर्नाटक सीमेपर्यंत जातात पुढे जात नाहीत.परंतु कर्नाटक शासनाच्या गाड्या बिना दिक्तत महाराष्ट्रात येत आहेत.याचा निषेध आज माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्रावर आणि मराठी भाषीकांनवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कम पणे त्याचा विरोध करेल.. हा फक्त निषेध व्यक्त केला आहे. परिस्थिती नाही सुधारल्यास कर्नाटक पासिंग गाड्या जिल्ह्यात फिरु देणार नाही अस या वेळेस महाराष्ट्र सैनिकांनी सांगितल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page