लोकसंवाद /- कुडाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामाजिक संस्था, राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी अभिवादन केले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन कुडाळ येथे साजरा करण्यात आला या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय जाधव, शहर शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर, नगरसेवक विलास कुडाळकर तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक किरण शिंदे, माजी नगरसेवक वेंगुर्लेकर, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर अन्य सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

फोटो भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना नगरसेवक विलास कुडाळकर, बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष लक्ष्मण कुडाळकर अन्य पदाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page