✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

आकेरी खानमोहल्ला येथे झालेल्या दुचाकी अपघातात बाहेरचा वाडा येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे. शहजाद उमरखान (४५) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संबंधित जखमीला वाहतूक पोलीस विलास नर व आबा पिरणकर यांनी खाजगी वाहनाच्या साहाय्याने रुग्णालय दाखल केले.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उमरखान हे आपल्या दुचाकीने सावंतवाडीच्या दिशेने येत होते. मात्र वाटेत त्यांचा अपघात नेमका कशामुळे झाला, ते कसे कोसळले हे कळू शकले नाही. दरम्यान त्या ठिकाणावरून जात असलेले वाहतूक पोलीस नर व पिरणकर यांनी उमरखान यांना जखमी अवस्थेत पाहिले. यावेळी खाजगी वाहनाच्या साह्याने त्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page