न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर येथे आयोजन..

लोकसंवाद /-

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत आयोजित मोफत लाठी काठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला हे शिबीर न्यू इंग्लिश स्कुल हळदीचे नेरूर हायस्कुल येथे संपन्न झाले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू असलेल्या प्राचीन मर्दानी युद्धकलेविषयी आवड निर्माण करणे, विरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकारशक्ती वाढविणे, चापल्य व कौशल्य वाढविणे. स्वसंरक्षणासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे आदी उद्दिष्टे समोर ठेवून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाने इच्छुक शाळा, हायस्कुल, कॉलेजमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे.

आजच्या या शिबिरातून मार्गदर्शक श्री किशोरजी सरनोबत यांनी हायस्कुलच्या निवडक विद्यार्थ्यांना लाठी काठीचे प्रशिक्षण दिले.आजच्या शुभरंभाच्या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष श्री मनोहर दळवी, श्री अरुण म्हाडगुत, श्री चंद्रसिंग वारंग, मुख्याध्यापक श्री शंकर कोराणे, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, संस्था सचिव श्री समीर नाईक, श्री लोहार सर, श्री दिलीप शेवळकर, श्री दयानंद आंबावले, श्री रोहन राऊळ, श्री संकेत सावंत, श्री स्वप्निल पालकर व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे हायस्कुल च्या संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page